स्थानिकांचा विरोध असल्यास त्या परिसरात दारूची दुकाने मंजूर करू नका – आ. जोरगेवार
हिवाळी अधिवेशनात आ. जोरगेवार यांची मागणी

चांदा ब्लास्ट
चंद्रपूरात मोठ्या प्रमाणात मध्य परवाणे दिल्या जात आहे. मात्र नागरिवस्तीत दारु दुकाने सुरु करण्यासाठी दिल्या जात असलेल्या परवण्याला स्थानिकांचा मोठा विरोध आहे. त्यामुळे लोकसमंतीशिवाय दारुचे दुकाने मंजुर करु नका अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रश्नोउत्तराच्या तासात बोलतांना सभागृहात केली आहे.
नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात आज मध्य परवाना विषयावर चर्चा दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात वाढत असलेल्या दारूच्या दुकानांबाबत ठाम मत मांडले. दारूबंदी उठवल्यानंतर चंद्रपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर बीअर शॉपी, वाईन शॉप, आणि बीअर बार सुरू होत असल्यामुळे नागरिकांत तीव्र नाराजी निर्माण होत असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
आमदार जोरगेवार म्हणाले की, ज्या भागात अशी दुकाने सुरू केली जात आहेत, त्या ठिकाणी स्थानिक पातळीवर विरोधाची लाट दिसून येत आहे. समाजजीवन, विद्यार्थी, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आणि सामाजिक वातावरण या सर्वांचा विचार करून दारू दुकान मंजुरीला लोक संमती आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी ठामपणे सांगितले.
जनतेच्या भावना न विचारता परवाना दिला जाऊ नये. परवाना देतांना संबंधित वॉर्डातील नागरिकांची संमती घेणे अनिवार्य केले पाहिजे. लोकशाहीत लोकांची मते सर्वात महत्त्वाची आहेत, असे मत व्यक्त करत त्यांनी सरकारने या विषयावर तातडीने ठोस धोरण आणण्याची मागणी केली आहे.



