ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बंजारा समाजाची आरक्षणासाठी ऐतिहासिक बैठक नागपूर येथे संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

महाराष्ट्र विधान परिषद सदस्य, महाराष्ट्र राज्य तथा बंजारा समजाचे धर्मगुरु श्री. बाबुसिंग महाराज पोहरादेवी धर्मपीठ यांच्या सोबत आरक्षण,राजपूत भामटा, घुसखोरी विषयी महत्वपूर्ण एतिहासिक बैठक व चर्चा 8 डिसेंबर रोजी संपन्न झाली.

इंजी. प्रवीण पवार सर यांच्या निवासस्थानी महाराष्ट्र विधान परिषद सदस्य, महाराष्ट्र राज्य तथा बंजारा समजाचे धर्मगुरु श्री. बाबुसिंग महाराज, पोहरादेवी धर्मपीठ यांच्या सोबत राजपूत भामटा, घुसखोरीला कसं थांबवता येइल या विषयी प्रदीर्घ चर्चा करण्यात आली, बंजारा आरक्षणाला धक्का लागणार नाही संदर्भात महत्वपूर्ण निर्णय बैठकीत सविस्तर चर्चा करुन घेण्यात आला.

प्रामुख्याने बोगस राजपूत भामटांची घुसखोरी पूर्णपणे थांबवून बंजारांच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही यासाठी बंजारा धर्मगुरू म्हणून मी कटिबद्ध आहे असे याप्रसंगी विधान परिषद सदस्य तथा धर्मगुरू बाबूसिंग महाराज यांनी प्रतिपादन केले. मी या माझ्या साठी बंजारा समाजाचे हित व विकास हेच सर्वोपरी असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.

या कार्यक्रमात नागपूर नगरीतील विविध क्षेत्रातील प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्याचे बाबुसिंग महाराजांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आले त्यात प्रामुख्याने प्रणिल प्रवीण पवार (वादविवाद स्पधेंत प्रथम आल्याबद्दल),वीर माणिक जाधव इयत्ता सातवीतील विद्यार्थीचे राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्थेत महाराष्ट्र टिममधून नॅशनलसाठी निवड झाल्याबद्दल आणि कु.दिपाली श्रीपत राठोड यांचे विविघ क्षेत्रातील कामगिरी बद्दल सत्कार करण्यात आले. या प्रसंगी बंजारा समाजाचे युवा नेते इंजि.श्री प्रवीण पवार, बंजारा समाजाचे नागपूर नगरीचे नायक आत्माराम चव्हाण व कारभारी अॅड. बद्रीप्रसाद चव्हाण, श्री पिरूसिंग राठोड, नायक, खरबी, श्री सुभाषभाऊ जाधव, श्री श्रीपतभाऊ राठोड,सामाजिक कार्यकर्ते व साहित्यिक श्री पंजाब जाधव श्री विनोद जाधव श्री माणिक जाधव व सामाजिक कार्यकर्ते. उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये