श्री संत जगनाडे महाराजांची ४०१ वी जयंती कोरपना नगरीत उत्साहात साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
तैलीक समाजाचे आराध्य दैवत व मानवधर्माची शिकवण देणारे महान संत श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या ४०१ व्या जयंतीनिमित्त कोरपना येथे उत्साहपूर्ण विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. तैलिक बहुउद्देशीय विकास संस्था, कोरपना यांच्या वतीने आयोजित या जयंती उत्सवात महिलांसह पुरुषांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.
दिनांक 8 डिसेंबर 2025, सोमवार रोजी सकाळी श्रीराम मंदिर परिसरातून ते बस स्टॉप ते श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज मंदिर असा ढोल–ताशांच्या गजरात भव्य कलश यात्रेचा शुभारंभ झाला. कलश यात्रेत शिस्तबद्ध मिरवणूक, भक्तीमय घोषणाबाजी आणि महिलांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती यामुळे परिसर भक्तिमय झाला होता.
या कलश यात्रेस जिल्हा बँकेचे संचालक विजयराव बावणे, संस्थेचे अध्यक्ष धनराज गिरडकर, सचिव उद्धव तडस, उपाध्यक्ष पांडुरंग वरभे, सहसचिव राजू खामनकर, कोषाध्यक्ष नारायण हजारे, सदस्य भारत चन्ने, विजय लोहबळे, प्रमोद गिरटकर, अनिल नागपुरे, प्रमोद बुटले, नितीन बावणे, साधूजी बावणे, ईश्वर खनके, टिनाताई गिरटकर, सविता इटणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच कोरपना शहरातील तैलीक समाज मोठ्या संख्येने सहभागी होऊन जयंती उत्सवाला भव्यता प्राप्त करून दिली.



