मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, बल्लारपूर येथे कुष्ठरोग तपासणी शिबिर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत रणदिवे
दि. 8 डिसेंबर 2025 रोजी मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बल्लारपूर येथे शहरी आरोग्य रुग्णालय अंतर्गत कुष्ठरोग तपासणी शिबिर घेण्यात आले . या शिबिरामध्ये शाळेच्या प्राचार्या असमा खान मॅडम तसेच प्रवीण कन्नाके सर कुष्ठरोग अधिकारी, स्वाती गोलपेलवार,क्षयरोग अधिकारी, व आरोग्य सेवक प्रितेश बुरांडे,चैतन्य येनूरकर, सुमेध सुखदेवे, आरोग्य सेविका बबिता बानोत,शांता नवले उपस्थित होते. त्या शिबिरामध्ये विद्यार्थिनींची कुष्ठरोग व क्षयरोग तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान वैद्यकीय पथकाने सर्व पाचवी ते बारावीच्या विद्यार्थिनींची तपशीलवार तपासणी करून त्यांच्या त्वचेवरील डाग, संवेदना कमी होणे तसेच इतर प्राथमिक लक्षणांची पाहणी केली.
एकूण _450__ विद्यार्थिनींची तपासणी झाली असून त्यापैकी _11__ विद्यार्थिनी संशयित आढळल्या व त्यांना पुढील उपचारांसाठी आरोग्य केंद्रात पाठविण्यात आले. तपासणीसह विद्यार्थिनींना कुष्ठरोगाबद्दल जागरूकता, प्रतिबंधक उपाय आणि वेळेवर उपचाराचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. एकूणच तपासणी कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.” या शिबिरामध्ये सर्व विद्यार्थिनी व शिक्षक-शिक्षिका उपस्थित होते.



