ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पिक विमा अनुदान तात्काळ जमा करा 

काँग्रेस पक्षाची मागणी ; तहसीलदारांना निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 कोरपना तालुक्यातील शेतकऱ्यांना पीकविमा व अतिवृष्टी रक्कम अद्याप न मिळाल्याने ती तात्काळ खात्यात जमा करण्यात यावी, या मागणीसाठी कोरपना तालुका काँग्रेस कमिटीने तहसीलदारांना निवेदन दिले.

निवेदन देताना तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उत्तम पेचे, जि.म. बँक संचालक विजयराव बावणे, माजी सभापती श्याम रणदिवे, भाऊराव चव्हाण, गणेश गोडे, सुरेश मालेकर, ओबीसी सेल अध्यक्ष राहुल मालेकर, अनिल गोंडे, सुदर्शन डवरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

चार महिने झालेल्या अतिवृष्टीमुळे कापूस, सोयाबीन, तूर यासह सर्व पिकांचे मोठे नुकसान झाले. सोयाबीन शेंगा कुजल्या, कापसाला फड बसली नाही आणि अनेक शेतकऱ्यांना उभे पीक गाडावे लागले. राज्य सरकारने जाहीर केलेले हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये अनुदान आणि पीकविम्याची रक्कम अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही, अशी माहिती निवेदनात देण्यात आली.

रक्कम तात्काळ जमा न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये