ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजाची लेक महाराष्ट्र कला गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 विद्याराज फाउंडेशन श्रीरामपूर यांचे वतीने दरवर्षी महाराष्ट्र राज्यातील विविध क्षेत्रात मौलिक कामगिरी केल्याप्रकरणी वेगवेगळे पुरस्कार देऊन त्या त्या व्यक्तीला सन्मानित करण्यात येते दिनांक 7 डिसेंबर २०२५ रोजी देऊळगावराजाची लेक उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शिका म्हणून प्रतीक्षा ताई कुलकर्णी (उपाध्ये) यांना सुप्रसिद्ध मराठी सिने अभिनेते गणेश यादव यांचे हस्ते महाराष्ट्र कला गौरव रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. गोविंदराव आदीक ऑडिटोरियम मध्ये संपन्न झालेल्या या पुरस्कार सोहळ्यास प्रसिद्ध अभिनेते सुनील गोडबोले विद्याराज फाउंडेशनचे प्रमुख निहाल कांबळे, सुनील पाटील उपस्थित होते त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये