कु.दिपाली श्रीपत राठोड यांचा सन्मान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
सेंट्रल इंडिया कॉलेज ऑफ फार्मसी द्वारा एआई इस इंक्रीजिंग अनएम्प्लॉयमेंट या विषयावर दिनांक ६ डिसेंबर २०२५ रोजी वाद विवाद स्पर्धा आयोजित करण्यात आली होती,त्यात डॉ. आंबेडकर कॉलेज,दीक्षाभूमी, नागपूर कडून कु. दिपाली श्रीपत राठोड यांची निवड करण्यात आली होती त्यात विशेष यश संपादन केल्यामुळे आज दिनांक रोजी ८ डिसेंबर २०२५, कॉलेज द्वारा आयोजित करण्यात आलेल्या भव्य कार्यक्रमात मा.माणिकराव कोकाटे,महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास आणि वक्फ मंत्री व मा.चंद्रदीप नरके,महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य व मा.प्रकाशराव आबिटकर महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री व संस्थाचालक मा. अनिस अहमद,माजी कॅबिनेट मंत्री व इतर मान्यवरांच्या हस्ते मानपत्र,मेडल रोख रक्कमेचा चेक देऊन स्वागत करण्यात आले.



