ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
गडचांदूर येथे संत जगनाडे महाराज यांची जयंती साजरी
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
तेली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती गडचांदूर येथे उत्साहात साजरी करण्यात आली.
विठ्ठल रुख्मिणी मंदिर ते फुले चौक ते वीर शेडमाके चौक ते संविधान चौक ते गांधी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते संताजी जगनाडे महाराज चौक पर्यंत पालखी काढण्यात आली
संताजी जगनाडे महाराज चौक येथे श्री च्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले
ज्येष्ठ नागरिक सभागृहात मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. संताजी जगनाडे महाराज यांच्या वेशभूषेतील युवक मुख्य आकर्षण होते
महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली
कार्यक्रमात महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. तेली समाज युवक मंडळाने कार्यक्रम यशस्वी करण्या करिता अथक प्रयत्न केले



