आंदोलनाचा धसका घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजवण्याचे काम केले सुरू
तहसील कार्यालयात आंदोलन कर्त्यांची बैठक संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- तालुक्यातील संपूर्ण रस्ते मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे खड्डेमय झालेले होते. यासंदर्भात आंदोलन करण्याचा इशारा सुग्रीव गोतावळे व अन्य कार्यकर्त्याने दिला होते. त्या अनुषंगाने ८ डिसेंबर ला तहसील कार्यालयात नायब तहसीलदार शील व पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण जाधव व विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.
या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजविण्याचे काम सुरू केलेले असून. त्यांनी संपूर्णतः डांबरीकरण केलेल्या रस्त्याचे काम हाती घेतलेले आहे. तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभागाने सुद्धा जिल्हा परिषदचे असलेले रस्ते यांचे सुद्धा खड्डे बुजविण्याचे काम तात्काळ हाती घेऊन पूर्ण करू असे सांगण्यात आले.यासंदर्भात बैठक घडवून आणली या बैठकीला सुग्रीव गोतावळे,गणेश वाघमारे,बंडू राठोड सौ सुमनबाई शेळके, शिवमोरे मामा,मोरताटे,लक्ष्मण मडावी,लहुजी गोतावळे,कोटंबे,राठोड,विष्णू अंपल्ले,सुशील गायकवाड व अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



