ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिवती तालुक्यातील विविध गावात अनंत दीपांच्या प्रकाशात महामानवाला अभिवादन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- ज्ञान, समता आणि मानवतेचा दीप प्रज्वलित करणारे ज्ञानाचे अथांग महासागर, महामानव, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जिवती तालुका भावविवश झाला. भारतीय बौद्ध महासभा, समता सौनिक दल, वंचित बहुजन आघाडी व स्थानिक सामाजिक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने येल्लापुर, पुनागुडा, परमडोली, शेणगाव, माराई पाटण, मुकादमगुडा आदी गावांमध्ये शेकडो अनुयायी, नागरिक, महिला-पुरुष, वयोवृद्ध आणि बालकांनी एकत्र येत महामानवाला कृतज्ञतेने अभिवादन करण्यात आले.

    महामानवाच्या पुतळ्यापुढे मेणबत्ती, अगरबत्ती आणि फुलांच्या सुवासाने वातावरण पवित्र झाले होते. मान्यवरांच्या हस्ते पूर्णकृती पुतळ्याचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले आणि मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर सर्वांनी एकत्र येत त्रिशरण पंचशील उच्चारत मानवतेचा संदेश नव्याने जागवला. वरील प्रत्येक गावात उपस्थित मान्यवरांनी बाबासाहेबांच्या संघर्षमय प्रवासाचे, समतेसाठीच्या लढ्याचे आणि ज्ञानक्रांतीचे स्मरण करून हळव्या शब्दांत आपली कृतज्ञता व्यक्त केली. गावातील पोलीस पाटील, सरपंच, प्रतिष्ठित नागरिक यांचेसह उपासक व उपासिकांची उपस्थिती उल्लेखनीय होती.

      संध्याकाळ होताच गावागावांत मेणबत्ती संचलनाने अंधाराला उजेडाच्या संदेशाने चिरडून टाकले. हातात मेणबत्ती, डोळ्यांत आदर आणि हृदयात बाबासाहेबांची शिकवण घेऊन नागरिक रस्त्यावर उतरले. छोट्या-छोट्या ज्योतींच्या रांगांमध्ये जणू बाबासाहेबांचे विचार उजळत असल्याचा भास होत होता.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये