ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नाथपीठ दिनदर्शिकेचे विमोचन संपन्न 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 देऊळगाव राजा शहरातील श्री संत नरहरीनाथ महाराज सेवा प्रतिष्ठानचे वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संस्कृती परंपरा व पंचांगाची परिपूर्ण माहिती असलेली नाथपीठ दिनदर्शिका भाविकांच्या सेवेत सादर करण्यात आलेली दिनदर्शिकेचे विमोचन 7 डिसेंबर रोजी शिवसेना शहरप्रमुख गोपाळ व्यास यांच्या हस्ते करण्यात आले जावे पंढरीसी आवडे मानसी| कधी एकादशी आषाढी हे ||

यावेळी श्री संत नरहरिनाथ सेवा प्रतिष्ठानचे प्रमुख मोहननाथ महाराज पैठणकर व उदबोध महाराज पैठणकर उपस्थित होते.

 शहरात आमना नदीच्या तीरावर श्री संत नरहरी नाथ महाराज सेवा प्रतिष्ठानचे वतीने अध्यात्मिक शिक्षणाबरोबरच आधुनिक शिक्षणाची जोड देत सुशिक्षित व संस्कृत युवा पिढी घडावी या हेतूने महर्षी वशिष्ठ वेद विद्यालय व श्री संत तुकाराम महाराज वारकरी विद्यालय हे वैदिक व वारकरी विद्यालय कार्यरत आहे यासोबतच कृष्णप्रिया गोशाळा व सिद्धांत सार ग्रंथालयाची निर्मिती या ठिकाणी करण्यात आलेली आहे लोकसभागातून सुरू असलेल्या येथील सर्वच उपक्रमांना भाविक भक्त मोठ्या प्रमाणात आर्थिक सहकार्य करताना दिसून येतात भविष्यात या ठिकाणी वैदिक व वारकरी विद्यालयाचे प्रत्येकी 100 विद्यार्थी निवास करू शकतील असे सुसज्ज विद्यार्थी निवास बांधण्याचे नियोजित आहेत तर एकाच ठिकाणी गोमातेचे संगोपन संवर्धन व गोरसाचे संशोधन होईल अशा सुविधांनी युक्त भव्य गोशाळा उभारण्याचा संस्थांनचा मानस आहे या संस्थांचे वतीने नाथ पीठ दिंनदर्शिका भाविकांच्या सुविधेसाठी प्रकाशित करण्यात आलेली आहे.

त्याचे विमोचन आज गोपाळ व्यास यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक विजय उपाध्ये, पत्रकार सन्मती जैन, एपीएमसी संचालक अभय दिडहाते, अतिश खराट, बलवंत (बंटी) सूनगत, पाथरकर उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये