ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आ. जोरगेवार यांच्या उपस्थितीत युवक काँग्रेस विधानसभा महासचिव वैभव रघाताटे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

चांदा ब्लास्ट

युवक काँग्रेस विधानसभा महासचिव वैभव रघाताटे यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत प्रकाश देवतळे यांच्या नेतृत्वात असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. हा कार्यक्रम आज रविवारी आमदार किशोर जोरगेवार यांच्या गजानन निवासस्थानी उत्साहात पार पडला.

यावेळी भारतीय जनता पार्टी अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडी महानगर अध्यक्ष छबु वैरागडे, विधानसभा अध्यक्ष दशरथ सिंह ठाकुर, महामंत्री सविता दंढारे, अॅड. राहुल घोटेकर, देवानंद वाढई आदींची उपस्थिती होती.

यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, आजचा दिवस केवळ पक्ष प्रवेशाचा नाही, हा विश्वासाचा दिवस आहे. वैभव रघाताटे यांच्यासारख्या तरुण नेतृत्वाचा आपल्या कुटुंबात प्रवेश हा आपल्या संघटनेला नवी ऊर्जा देणारा आहे. राजकारण म्हणजे पदाचा अभिमान नव्हे, तर जबाबदारी आहे. जनता आपल्या पासून अपेक्षा ठेवते. या अपेक्षा पूर्ण करण्याची ताकद कार्यकर्त्यांत आहे. प्रत्येक कार्यकर्ता हा या पक्षाचा आधारस्तंभ आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक भागात आपण काम केले आहे. अभ्यासिकांचा उभार, रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा यासह प्रत्येक ठिकाणी आपण योजनाबद्ध काम केले आहे. लोकांच्या जीवनमानात बदल दिसायला लागला आहे. पक्षात येणाऱ्याचे आपण कौतुक करतो, जपतो आणि योग्य संधी देतो. पक्ष प्रवेश म्हणजे शेवट नाही, तर ती सुरुवात आहे, असे ते यावेळी म्हणाले.

यावेळी रघाताटे यांच्यासह आलेल्या सर्व कार्यकर्त्यांच्या गळ्यात भारतीय जनता पक्षाचा डुपट्टा घालून आमदार किशोर जोरगेवार यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. वैभव रघाताटे यांनी पक्ष प्रवेशानंतर सांगितले की, आमदार किशोर जोरगेवार यांच्या विकासकामांनी प्रभावित होऊन आम्ही भाजपात आलो आहोत. चंद्रपूरात विकासाची नवी दिशा सुरू झाली आहे. आम्ही या प्रवासात सक्रिय सहभाग करणार, असे ते यावेळी म्हणाले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये