ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात श्री दत्त जयंती उत्साहात साजरी
महाप्रसादने सांगता
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, भगवानबाबा नगर, देऊळगाव राजा येथे श्री दत्त जयंती निमित्ताने अखंड नाम जप यज्ञ सप्ताह व श्री गुरु चरित्र पारायण वाचन सोहळाचे आयोजन 28 नोव्हेंबर पासून सुरू करण्यात आले होते.
या सोहळ्यात 169 सेवेकरी सहभागी झाले रोज सकाळी आठ वाजता भूपाळी आरती झाल्यानंतर पारायण वाचन सुरू होते, त्यानंतर 10.30 वाजता नैवेद्य आरती झाल्यानंतर 29 नोव्हेंबर पासून नित्यस्वाहाकार घेण्यात आले,5 डिसेंबर रोजी सप्ताहाची सांगता महाप्रसाद ने केली. शेकडो भाविकांनी महाप्रसाद चा लाभ घेतला, सप्ताह यशस्वी करण्यासाठी केंद्राचे सेवेकरी यांनी मेहनत घेतली.



