देऊळगाव राजा येथे 9 डिसेंबर पासून अखंड हरिनाम सप्ताह

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
ब्र रंगनाथ गुरुजी परभणीकर यांच्या 56 व्या पुण्यतिथी निमित्ताने भव्य फिरता नारळी अखंड हरिनाम सप्ताह चे आयोजन 9 डिसेंबर पासून कुंभारी येथील गजानन महाराज मंदिर येथे करण्यात आले आहे.
16 डिसेंबर पावेतो चालणाऱ्या या हरिनाम सप्ताहात भागवत कथा प्रवक्ते ह भ प डॉ भगवानबाबा आनंदगडकर असून दररोज विविध मान्यवरांचे किर्तन होणार आहे,
या कार्यक्रमाच्या निमित्ताने केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, आमदार मनोज कायंदे, माजी आमदार डॉ राजेंद्र शिंगणे,डॉ शशिकांत खेडेकर, उपस्थित राहणार आहेत.
हरिनाम सप्ताह ची सांगता 16 डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता ह भ प डॉ. भगवानबाबा आनंदगडकर यांच्या काल्याचे किर्तन व महाप्रसाद ने होईल.
अखंड हरिनाम सप्ताहात भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक श्री रंगनाथ गुरुजी पुण्यतिथी सोहळा प्रतिष्ठान समिती, देऊळगाव राजा यांनी केले आहे.



