ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सर्वांगीण विकास हाच भाजपा सरकारचा मूलमंत्र – आमदार देवराव भोंगळे

आसन (बू) येथील काँग्रेस व शेतकरी संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी धरली भाजपची वाट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

मतदारसंघाचा सर्वांगीण विकास, पायाभूत सुविधा आणि जनकल्याण हे आमचे मुख्य ध्येय आहे. गावोगावी रस्ते पाणीपुरवठा,आरोग्य,शिक्षण यासारख्या मूलभूत सोयीसुविधा पोहचविणे ही आमची प्राथमिकता आहे. शासनाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहचवून विकासकामे अधिक जलदगतीने पूर्ण करण्यात येत आहे. त्यामुळे सर्वांगीण विकास हाच भाजपा सरकारचा मूलमंत्र असल्याचे प्रतिपादन आमदार देवराव भोंगळे यांनी केले.

कोरपना तालुक्यातील आसन (बू) येथील काँग्रेस व शेतकरी संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राजुरा येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात भाजपात जाहीर पक्षप्रवेश केला.यावेळी ते बोलत होते.

आमदार देवराव भोंगळे पुढे म्हणाले की, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मान. नरेंद्रजी मोदी व राज्याचे लाडके मुख्यमंत्री मान.देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात विकासकामांना गती देण्यात आली आहे. नागरिकांच्या अडचणी प्रत्यक्ष जाणून त्या सोडवण्यासाठी ठोस निर्णय घेतले जात आहे. शासनाच्या सर्व योजना तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपा सरकार सदैव कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी आमदार भोंगळे यांनी दिली.

यावेळी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेल्या नवप्रवेशित कार्यकर्त्यांमध्ये अनिल गेडाम, अमोल सोयाम, छगन गेडाम, अजय मडावी, किशोर गेडाम, नंदलाल जुमनाके, राजु गेडाम, प्रफुल सुरपाम, सुनील गेडाम, प्रज्वल सुरपाम, रितेश गेडाम, भारत मरस्कोल्हे, हर्षल गेडाम, समीर कोटनाके, प्रीतम सोयाम, संदीप कोटनाके,नरेंद्र गेडाम, ओम जुमनाके, गणेश गेडाम,सचिन गेडाम, समीर पंधरे, क्रांती जुमनाके, रवींद्र गेडाम, स्वप्निल गेडाम, विनोद कोटनाके,प्रकाश कन्नाके, निलेश वेट्टी,आकाश कन्नाके, राम पंधरे, तमन्ना शेख, सुयोग आगलावे यांचा समावेश आहे.

आमदार देवराव भोंगळे यांचे नेतृत्व सर्वसामान्य जनतेला पटले असून आम्ही भाजपात पक्षप्रवेश करीत असल्याची भावना भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेल्या नवप्रवेशित कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी भाजपाचे कोरपना तालुकाध्यक्ष संजय मुसळे,ओबीसी मोर्चाचे तालुकाध्यक्ष अशोक झाडे, प्रशांत पाचभाई,सागर धूर्वे यांचेसह भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये