ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दिव्यांगांना प्रगतीच्या प्रवाहामध्ये आणणे हीच महामानवाला खरी आदरांजली _ प्राचार्य अनिल मुसळे

श्री प्रभू रामचंद्र विद्यालयात महानिर्वाण दिन दिव्यांग सप्ताह साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

नांदा फाटा :- श्री प्रभू रामचंद्र विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शिक्षण विभागाच्या परिपत्रकानुसार आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत दिव्यांग सप्ताह दिन तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा परिनिर्वाण दिन नुकताच साजरा करण्यात आला.

यावेळी विद्यार्थ्यांकरिता दिव्यांग सप्ताह निमित्य निबंध स्पर्धेचे आयोजन व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा तसेच समाजातील तळागळामध्ये प्रगतीच्या प्रवाहापासून दूर उपेक्षित असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रगतीच्या प्रवाहामध्ये आणण्याकरिता प्रत्येकाने कसोशीने प्रयत्न करावे हीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र श्रद्धांजली ठरेल असे विचार आचार्य अनिल मुसळे यांनी व्यक्त केले त्याचप्रमाणे कार्यक्रमाच्या मुख्य मार्गदर्शक पदी गुरुकुल कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य राजेश डोंगरे यांनी संविधान निर्मितीच्या वेळी आंबेडकरांना सहन करावे लागणाऱ्या यातना व बालपणी जगावे लागलेले उपेक्षित जीवन युवा अवस्थेमध्ये तत्कालीन संस्थानिकांनी केलेली शिक्षणासाठी भरीव मदत याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले मंचावर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ शिक्षक संदीप खीरटकर, शकील शेख, रामकृष्ण रोगे उपस्थित होते.

अध्यक्षांच्या हस्ते विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला शिवाय त्यांना मंचावर विराजमान करण्यात आले कार्यक्रमाच्या सूत्र संचालन अजय बारसागडे तर आभार सचिन बोढाले यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये