ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणजे काळाच्या प्रवाहात जन्माला आलेले युगपुरुष – प्रदीप पुल्लरवार पोलिस निरीक्षक

विश्वशांती विद्यालयात संविधान दिन साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

ज्यांच्या कर्तृत्वाने अज्ञानी माणसाला सन्मानाने जगायला शिकवले,त्यांचे आयुष्य धगधगते यज्ञकुंड होते,त्यांच्या संपूर्ण आयुष्याला एका शब्दांमध्ये सांगायचं असेल तर तो शब्द म्हणजे संघर्ष होय. डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणजे काळाच्या प्रवाहात जन्माला आलेले युगपुरुष होते असे विचार महापरिनिर्वाण दिनी मार्गदर्शक म्हणून सावली पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक प्रदीप पुल्लरवार बोलत होते.

भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली द्वारा संचालित मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा प्रथम क्रमांक प्राप्त विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय सावली येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दीन साजरा करण्यात आला.

आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावार होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस निरीक्षक प्रदीप पुल्लरवार, विद्यालयाचे पर्यवेक्षक राजेश झोडे, ज्येष्ठ शिक्षक किशोर संगीडवार, श्वेता खर्चे,सुधीर जीवतोडे,पोलिस शिपाई मोहन दासरवार,उपस्थित होते,याप्रसंगी विद्यालयाचे शिक्षक रवींद्र कन्नाके आणि सुधीर जीवतोडे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्यावर प्रकाश टाकला.शालेय विद्यार्थ्यांनी भाषणे आणि गीत सादर करीत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाचे संचालन विद्यालयाच्या सहाय्यक शिक्षिका मेघा संगीडवार यांनी केले तर आभार सहाय्यक शिक्षक युगंधर भोयर यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विद्यालयाचे विद्यार्थी शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी वृदांनी मोलाचे सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये