चोरीस गेलेली मोटारसायकल हस्तगत
आरोपी चोरट्यास भद्रावती पोलिसांनी ठोकल्या बेड्या
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
शहरातील गुलमोहर पार्क, गेट क्रमांक 2 संताजी नगर येथून 4 नोव्हेंबर 2025 रोजी चोरीस गेलेली सीडी डिलक्स मोटारसायकल (किंमत सुमारे 20 हजार रुपये) भद्रावती पोलिसांनी अल्पावधीतच शोधून काढली. फिर्यादी शंकर कवाडे यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला होता. गोपनीय बातमीदाराच्या मदतीने रेकार्डवरील आरोपी विकास ऋषी बावणे (रा. गुरूनगर, भद्रावती) यास पोलिसांनी ताब्यात घेतले.
चौकशीत गुन्ह्याची कबुली मिळताच चोरीस गेलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली. ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक चंद्रपूर, मा. अप्पर पोलीस अधीक्षक, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल (वरोरा) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच या कारवाईत पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी, पो.उ.नि. गजानन तुपकर, महेंद्र बेसरकर, जगदीश झाडे, अनुप अस्तुंकर, विश्वनाथ चौधरी, गोपाल आतकुलवार, योगेश घाटोळे, रोहित चिडगिरे, खुशाल कावळे, संतोष राठोड यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.



