मुस्लिम वक्फ मालमत्ता नोंदवण्यासाठी उम्मीद पोर्टल डेटा अपलोडची मुदत वाढवा
सय्यद शब्बीर जागीरदार यांची मागणी
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- मुस्लिम वक्फ मालमत्ता नोंदवण्यासाठी भारत सरकारने उम्मीद पोर्टल सुरू केले आहे. आणि वक्फ मालमत्ता नोंदवण्यासाठी आजची शेवटची तारीख असल्यामुळे उम्मीद पोर्टल डेटा अपलोड ची मुद्दत वाढवावी अशा मागणीचे निवेदन किरेन रिजिजू केंद्रीय अल्पसंख्यांक कार्यमंत्री भारत सरकार यांना तहसीलदार जिवती यांच्यामार्फतीने देण्यात आले. देशभरातील मुस्लिम समाजाचे अनेक मस्जिदी, ईदगाहे, कब्रस्तान, दर्गाहे, धार्मिक मदरसे, सूफी खानकाये व तसेच इतर वक्फ मालमत्ता आजही उम्मीद पोर्टलवर नोंदवायच्या बाकी आहेत. पोर्टल वरील तांत्रिक अडथळे, धीमे सर्व्हर, लॉगिन समस्या यामुळे सर्वसामान्यांना तसेच वक्फ समित्यांना मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहे.
अशा परिस्थितीत अंतिम मुद्दत वाढ न झाल्यास हजारो मालमत्तांचा डेटा प्रलंबित राहू शकतो. डेटा अपलोड प्रक्रियेतील तांत्रिक समस्या दूर कराव्यात आणि अंतिम मुद्दत वाढवून मस्जिदी, ईदगा, कब्रस्तान, दर्गा, धार्मिक मदरसे, सूफी खानकाये व इतर वक्फ मालमत्ताच्या कमिटीच्या सदस्यांना दिलासा द्यावा ही समस्या केवळ तांत्रिक नसून कोट्यावधी लोकांच्या आस्था व धार्मिक मालमत्ता अधिकाराशी संबंधित आहे. म्हणून उम्मीद पोर्टल डेटा अपलोडची मुद्दत वाढवावी अश्या मागणीचे निवेदन सय्यद शब्बीर जागीरदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (एपी) तालुका जिवती यांच्यावतीने करण्यात आले आहे.



