अल्ट्राटेक कुसूंबी उत्खनन वाहतुक ठप्प आदिवासीचा एल्गार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
पुर्वीच्या दि. सेंचुरी टेक्स प्रा. ली मुंबई च्या मानीकगड कुसूंबी चुनखड्डी माईन्स मध्ये आलेल्या १८ आदिवासी कोलामाच्या शेती उद्धवस्त करूण कंपनीने नियम बाह्य उत्खनन केल्याने गेल्या १५वर्षा पासून कंपनी व आदिवासी शेतकऱ्याचा संघर्ष सुरू आहे मात्र महसुल प्रशासन व कंपनी व्यवस्थपनाचे बळी आदिवासी शेतकऱ्याचा घेता विवाद निकाली काढण्या ऐवजी रेंगाळल्या
जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आबिद अली यांनी केला आहे गत १५ महिण्यापासून माईन्स क्षेत्रात ठिय्या आंदोलन सुरु आहे अप्पर जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी तहसिलदार निरीक्षक भुमी अभिलेख उपवन संरक्षक वनपरीक्षेत्र अधिकारी यांच्या समवेश४ -६वेळा बैठका झाल्या परंतु निर्णय न झाल्याने संतप्त आंदोलनकर्ते आदिवासी माईन्स आफीस समोर ठिय्या व कामबंद आंदोलन दि४ पासून सुरु केल्याने कंपनीचे संपूर्ण वाहतुक व उत्खनन ठप्प पडले आहे यापूर्वी २४ आदिवासीची जमिन प्रकरणात नागपूर उच्च न्यायलयात रिट पिटीशन दाखल असून न्याय प्रविष्ठ असताना कंपनी यापूर्वी लिज करारात मोबादला १९८४-८५मध्ये दिला असताना त्या मोबादला व निवास करीता अनुदान व नोकरी ची आमीष दाखवून दिक्षाभुल केल्या जात आहे हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असून कोनतेही आदेश न्यायलयाने दिले नसताना कंपनी दिशाभुल करीत असत्याचा आरोप आदिवासीनी केला आहे
ज्याचे आंदोलन सुरु आहे बाम्बेझरी येथिल कोलामाची जमीन भुमापन मोजणी मे मध्ये झाली परंतु महसुल अधिकारीनी ताबा दिला नाही कंपनी व्यवस्थपनाने जुन मध्ये मोजणी फी भरण्याची लेखी हमीपत्र दिले मात्र अजुन पर्यंत रक्कम भरली नसल्याने कुसूंबी नोकारी येथिल मोजणी रखडली आहे यामुळे आंदोलन चिघडले असून ठोस निर्णय झाल्या शिवाय उठणार नाही अशी भुमीका आदिवासी आंदोलनकर्त्यानी घेतली आहे



