ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
८ डिसेंबर रोजी श्री. संताजी जगनाडे महाराज जयंती कार्यक्रमाचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत रणदिवे
शहरातील संत श्री संताजी सेवा मंडळाच्या वतीने येत्या ८ डिसेंबर (सोमवार)रोजी संत श्री संताजी जगनाडे महाराजांची जयंती कार्यक्रम सोहळा संपन्न होणार आहे.आयोजित कार्यक्रमात सकाळी १० वाजता घटस्थापना पूजा आरती, दुपारी २ वाजता श्री ची पालखी शोभा यात्रा, सायंकाळी ६ वाजता गुणवंत विद्यार्थ्यांचा व प्रमुख अतिथींचा स्वागत सत्कार,महाप्रसाद कार्यक्रम संपन्न होणार आहे.
आयोजित पालखी सोहळ्यात संत.गजानन महाराज शेगाव, जिल्हा बुलढाणा येथील प्रसिद्ध गोविंद महाराज वारकरी शिक्षण संस्था येथील भजन मंडळ हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण असणार आहे. या सोहळ्यात जास्तीत जास्त समाज बांधवांनी उपस्थित रहावे, अशी विनंती संत श्री संताजी सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.



