चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे सभासद सहकारी संस्थांच्या खात्यात लाभांष जमा

चांदा ब्लास्ट
बँकेला मार्च २०२५ अखेर रु. ३३.८३ कोटीचा विक्रमी निव्वळ नफा झालेला असुन बँकेच्या भागधारक संस्थांना मा. अध्यक्ष महोदयांनी संस्थांचे भागधारणेवर ६ टक्के लाभांष देण्याची घोषणा केले त्यास दि. ३०/०९/२०२५ चे मा वार्षीक सर्वसाधारण सभेत सर्वानुमते मान्यता दिली व श्री. रविंद्र श्रीनिवासराव शिंदे अध्यक्ष महोदयांचे आभार व्यक्त केले.
त्या अनुषंगाने बँकेनी आपल्या भागधारक संस्थाचे खात्याला लाभांष रक्कम वर्ग केलेले असुन ज्या संस्थांना लाभांष प्राप्त झालेला नसेल त्यांनी त्यांचे अचुक बैंक खाते क्रमांकासह बँकेचे प्रमुख्य कार्यालयांत हिशेब विभागाशी संपर्क साधावा.
तसेच ज्या संस्थांची हिस्से बाकी रु. १०००/- चे पटीत नाही त्या संस्थांनी फरकाची रक्कम त्वरीत भरणा करुन हिस्से बाकी रु. १०००/- चे पटीत पूर्ण करावी अशी विनंती बँकेमार्फत करण्यात येत आहे.



