कॉंग्रेसच्या माजी शहराध्यक्ष विजया बंडेवार यांचा आ. जोरगेवार यांच्या उपस्थितीत भाजपात जाहीर प्रवेश
उबाठाचे उपतालुका प्रमुख गणेश शेंडे यांनीही कार्यकर्त्यांसह घेतला प्रवेश

चांदा ब्लास्ट
घुग्घुसच्या कॉंग्रेसच्या माजी शहराध्यक्ष विजया बंडेवार तसेच उबाठाचे उपतालुका प्रमुख गणेश शेंडे यांनी आज मंगळवारी कार्यकर्त्यांसह आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत घुग्घुस येथे भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे भाजपाला स्थानिक पातळीवर अधिक बळकटी मिळणार आहे. आमदार किशोर जोरगेवार यांनी या दोन्ही नवनियुक्त सदस्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या सक्षम नेतृत्व आणि राज्याचे नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकुशल, पारदर्शक व जनहितैषी कामकाजावर विश्वास ठेवून कॉंग्रेसच्या माजी शहराध्यक्ष विजया बंडेवार, कॉंग्रेस नेते अशोक बंडेवार आणि गणेश शेंडे यांनी भाजपाचा विचार स्वीकारला आहे.
यावेळी नवनियुक्त सदस्यांचे पक्षात स्वागत करताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रहित, विकास आणि सर्वसमावेशक प्रगतीचा मार्ग स्वीकारणारा पक्ष आहे. आज विजया बंडेवार आणि गणेश शेंडे यांनी आमच्या पक्षावर ठेवलेला विश्वास हा आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्या अनुभवामुळे आणि नेतृत्वामुळे संघटना अधिक बळकट होईल आणि घुग्घूसमध्ये विकासाची नवी ऊर्जा निर्माण होईल, असा विश्वास आहे. पक्षात येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचे योगदान मौल्यवान असून त्यांच्या सन्मानाचे रक्षण करणे ही आमची जबाबदारी आहे. विकासाच्या प्रवासात आम्ही एकजुटीने काम करत राहू आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध राहू, असे यावेळी ते म्हणाले.



