ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महायुतीच्या भूतपूर्व यशात शिवसेनेचा सर्वात मोठा वाटा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

भद्रावती येथे एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

              महायुतीला विधानसभेत मिळालेल्या ऐतिहासिक यशात शिवसेनेचा निर्णायक आणि सर्वात मोठा वाटा असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भद्रावतीतील प्रचार सभेत केले. “शिवसेना कार्यकर्ते जेव्हा मनाशी ठरवतात, तेव्हा काडी–दगडावरही भगवा फडकवतात. आमची युती विकासाशी आहे. लोकांच्या मनातलं सरकार आणण्यात शिवसेनेचा सर्वात मोठा ‘स्ट्राईक रेट’ आहे,” असे शिंदे म्हणाले.

नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ यशवंतराव शिंदे मैदानावर आयोजित सभेत ते बोलत होते. भद्रावती नगराध्यक्ष पदासाठी महायुतीचे उमेदवार प्रफुल चटकी तसेच २९ नगरसेवक उमेदवारांच्या समर्थनार्थ ही सभा घेण्यात आली. यावेळी वरोरा–भद्रावती संघटक मुकेश जीवतोडे, जिल्हाप्रमुख युवराज धानोरकर यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

मी असेपर्यंत ‘माझी लाडकी बहीण’ योजना बंद होणार नाही

शिंदे यांनी यावेळी ‘माझी लाडकी बहीण’ योजनेबाबत स्पष्ट भूमिका मांडली.

“मुख्यमंत्री असताना अनेक योजना राबवल्या. त्यात ‘माझी लाडकी बहीण’ ही आवडती योजना आहे. काहींनी अडथळे आणले, कोर्टात गेले, पण योजना बंद पडली नाही. आणि मी आहे तोपर्यंत ती बंद होणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

भद्रावतीत भगवा झेंडा फडकणार

राज्यातील विकासकामांचा उल्लेख करत शिंदे म्हणाले, “जनतेने विकास प्रत्यक्ष पाहिला आहे. त्याच भरोशावर भद्रावतीत शिवसेनेचा भगवा झेंडा फडकणार, याची मला खात्री आहे.”

सभेमुळे भद्रावतीतील राजकीय वातावरण अधिकच रंगले असून महायुतीच्या प्रचाराला गती मिळाल्याचे दिसून आले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये