गुरुकुल महाविद्यालयात संविधान दिन साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
गुरुकुल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नांदा येथे महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाद्वारे दिनांक 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय मंडळाचे सचिव डॉ.अनिल मुसळे, गुरुकुल महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.राजेश डोंगरे,प्रा. सचिन कनेंवार, प्रा. आशिष पईनकर प्रा. देवतळे प्रा. बावणे प्रा. लालसरे प्रा. पानपट्टे प्रा. पानघाटे प्रा. डुमोरे प्रा. बांगडे प्रा. सातपुते प्रा. दुर्योधन प्रा. बल्की यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
सर्वप्रथम डॉ. अनिल मुसळे यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून, संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.यानंतर सर्व उपस्थिताना संविधानानुसार आचरण करण्याची शपथ देण्यात आली.
सदर कार्यक्रमात डॉ. अनिल मुसळे यांनी भारताचे संविधानच विविध धर्म व जातीच्या 140 कोटी लोकसंख्येला एक देशाच्या रूपात जोडते असे मार्गदर्शन केले. डॉ. राजेश डोंगरे यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रा. आशिष पईनकर तर आभार प्रदर्शन प्रा. सचिन करनेवार यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रफुल्ल मुसळे, संतोष चौधरी, प्रशांत नवले, सविन मडावी, शालिक कांबळे व अनिता बुरान यांनी परिश्रम घेतले.



