ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
देऊळगाव राजा येथे खंडोबा मंदिरात महाआरती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा येथे टेकडीवर असलेले श्री ओम शिवमल्हार खंडोबा मंदिर या ठिकाणी तहसील कार्यालयाच्या कर्तव्यदक्ष तहसीलदार वैशाली डोंगरजाळ, नायब तहसीलदार सायली जाधव, तसेच देऊळगाव राजा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ब्रम्हागिरी, यांच्या शुभहस्ते 25 नोव्हेंबर रोजी खंडेरायाची महाआरती करण्यात आली या प्रसंगी पोलीस कर्मचारी समाधान बंगाळे, विजय दराडे, डॉ. अक्षय गुठे संस्थानचे विश्वस्त केशव कोंडीबा खांडेभराड,गोविंदराव दारकोंडे, मामा, नंदू खांडेभराड, खंडू खांडेभराड, विष्णू खांडेभराड, व इतर भाविक भक्त उपस्थित होते.
खंडोबा मंदिर हे प्राचीन असून चंपाष्टमी निमित्ताने दरवर्षी येथे मोठी यात्रा भरते, शहर तसेच परिसरातील अनेक भाविक दर्शनासाठी मोठ्या संख्येने येत असतात.



