ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नगर परिषद निवडणूक मतदान अधिकाऱ्यांचे दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण पूर्ण 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

नगर परिषद देऊळगाव राजा सार्वत्रिक निवडणूक 2025 अन्वये मतदान केंद्र अध्यक्ष व मतदान अधिकारी यांना द्वितीय टप्प्यातील प्रशिक्षण दिनांक 24 नोव्हेंबर रोजी देण्यात आले.

सदर प्रशिक्षणास एकूण 136 अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. प्रशिक्षणादरम्यान मतदान प्रक्रियेची अंमलबजावणी, EVM मशीनची हाताळणी, सुटकेसची सीलिंग प्रक्रिया, मतदार पडताळणी, दिव्यांग अनुकूलता, तसेच आचारसंहिता पालनाविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

या प्रशिक्षण कार्यक्रमास निवडणूक निर्णय अधिकारी श्री. सुरेश थोरात, निवडणूक निरीक्षक श्री. जी. पी. साबळे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी श्रीमती सुप्रिया चव्हाण, अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती वैशाली डोंगरजाळं हे मान्यवर उपस्थित राहून अधिकारी–कर्मचारी यांना आवश्यक त्या सूचना, पर्यवेक्षणीय मार्गदर्शन व निवडणूक प्रक्रियेतील संवेदनशील बाबींची माहिती दिली.

सार्वत्रिक निवडणूक 2025 सुव्यवस्थित, पारदर्शक, मतदारहितवादी व शांततामय वातावरणात पार पाडण्यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये