ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दारूच्या नशेत वाहन चालवीणारे मोटार सायकल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

मोटारसायकल केली जप्त वाहतूक शाखेची कार्यवाही 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दि. 24/11/25 रोजी मा पोलीस अधीक्षक श्री अनुराग जैन सर यांच्या आदेशानवये वाहतूक पोलिसांची आर्वी चौकातआज दुपारी नाकाबंदी नेमण्यात आलेली होती तेव्हा एक मोटार सायकल चालक हl विनानंबर प्लेंट ची मोटार सायकल हिरो होंडा घेऊन निष्काळजी पणे झिकझ्याक पद्धतीने गाडी चालवीतना आर्वी नाक्यावर दिसून आला त्यावरून त्याच्या जवळ जावून वाहतूक पोलीस अंमलदार संतोष राठोड यांनी त्यास त्याचे गाडी चालवीन्याचे लायसेन्स ची मागणी केली असता त्याचा दारू पिल्याचा वास आला त्यावरून त्याची दारू पिल्याची मेडिकल तपास्नी केली असता त्याच्या मेडिकल तपास्नी मध्ये तो चालक सतीश वामनरावं निकाडे वय 26 वर्ष रा धनतोली चौक वर्धा हl दारू पिवून दारूच्या नशेमध्ये असल्याचे त्याच्या रक्तात 503 mg दारूचे प्रमाण मिळून आल्याने चालक सतीश वामनराव निकाडे रा वर्धा याच्या विरुद्ध मोटार वाहन कायदा कलम 185 अन्वये पोलीस हवालदार संतोष राठोड यांच्या तक्रारी वरून गुन्हा नोंद करण्यात आला असून सदर बिना नंबर ची मोटारसायकल हि जप्त करण्यात आलेली आहे

तरी सर्व वाहन चालकांना वाहतूक शाखे कडून आवाहान करण्यात येते कि आपले वाहन दारू पिवून दारूच्या नशे मध्ये चालवू नये अन्यथा कायदेशीर कार्यवाही हि करून वाहन जप्त करण्यात येईल असे आवाहान वाहतूक पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी वाहन चालक यांना केलेले आहे

पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा वर्धा.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये