पोलीस ठाणे वर्धा शहर गुन्हे प्रगटीकरण पथकाची कामगीरी
मंदीरात चोरी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.अविनाश नागदेवे
दिनांक 28/10/2025 ते दि. 29/10/2025 रोजी चे रात्रदरम्यान वर्धा शहरातील मास्टर कॉलणी रहिवासी परीसरात असलेल्या रमाई आंबेडकर उद्यानातील बुद्ध विहारामध्ये असलेल्या अंदाजे 5 किलोग्रॅम वजनाची भगवान गौतम बुद्धाची पितळी मुती कि. 6000 रू ची कोणीतरी अज्ञात ईसमाने चोरी केल्यावरून पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला होता.
पोलीस निरंतर अज्ञात आरोपीचा शोध घेत असतांना दिनांक 21.11.2025 रोजी बोरगांव मेघे महारूद्र हनुमान मंदीरात चोरीचा प्रयत्न झाल्याने पोलीसांनी अज्ञात ईसमाना शोध घेतला असता त्यांना ईसम नामे श्रावण कृष्णाजी खाकरे वय 64 वर्ष रा. राजापेठ, हुडकेश्वर रोड, नागपुर ह.मु. जुना पुलगाव, गजानन मंदीराजवळ, पुलगांव हा संशईत रित्या फिरतांना मिळुन आल्याने विचारपुस दरम्यान त्याने वरील दोन्ही गुन्हे केल्याचे पोलीसांना सांगीतल्याने आरोपीचे राहते घरून भगवान गौतम बुद्धाची पितळी मुर्ती अंदाजे 5 किलो वजनाची कि. 6000 रुची जप्त करण्यात आली.
तसेच आरोपीचे ताब्यातुन कुलुप तोडण्याकरीता वापरत असलेले आरी व सळाख बांधणीकरीता वापरत असलेली हुक जप्त करण्यात आली आहे. नमुद आरोपी हा सराईत गुन्हेगार असुंन त्याचेवर नागपुर शहर तसेच वर्धा जिल्हयात मंदीरातील चोरीचे भरपुर गुन्हे नोंद आहे. सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक अनुराग जैन, मा. अपर पोलीस अधिक्षक सदाशीव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मुकेश्वर, पोलीस निरीक्षक संतोष टाले यांचे मार्गदर्शनात गुन्हे प्रगटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक शरद गायकवाड, पोलीस अंमलदार गजेंद्र धर्मे, शैलेश चाफलेकर, नरेंद्र कांबळे, पवन लव्हाळे, अभिजीत वाघमारे व इतर यांनी केली त्यामुळे शहर परीसरात होत असलेल्या मंदीरातील चोरीचे गुन्हयाला आळा बसण्यास पोलीसांना मदत झाली.



