ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
5 वर्षापासून बंद असलेला जुना शेत रस्ता अखेर झाला खुला

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
सिनगाव जहांगीर येथे खल्ल्याळ गव्हाण रस्ता गेल्या 5 वर्षांपासून बंद होता, त्यामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता. उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या आदेशानुसार आज 24 नोव्हेंबर रोजी गट न 36 मधून पूर्वेकडे जाणारा जुना शेत रस्ता गट न 37 पर्यंत मंडळ अधिकारी विजय हिरवे यांच्या उपस्थितीत पोलिस संरक्षण मध्ये खुला करण्यात आला.
याप्रसंगी महिला पोलीस उप निरीक्षक क्रांती ढाकणे, पोलिस कॉन्स्टेबल माधव कुटे, ग्राम महसूल अधिकारी सुरेश डोईफोडे, अर्जदार, गैर अर्जदार व पंच मोक्यावर उपस्थित होते, यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.



