महाराष्ट्र राज्याचे दुसरे मुख्यमंत्री मा. सा. कन्नमवार यांच्या पुण्यतिथी निमित्त अर्धाकृती पुतळ्यास माल्यार्पण
मा. सा. कन्नमवार यांचे जीवन भानापेठ प्रभागात व्यतीत झाले हे अभिमानाची बाब - सुरज पेदुलवार

चांदा ब्लास्ट
महाराष्ट्र राज्याचे दुसरे मुख्यमंत्री मा. सा. कन्नमवार यांनी संता प्रमाणे आपले राजकीय जीवन व्यतीत केले होते. त्यांनी आपल्या मुख्यमंत्री काळामध्ये राज्याच्या विकासाचा संकल्प सिध्द केला होता.
मा. सा. कन्नमवार यांनी आपले बालपण चंद्रपूर शहरातील भानापेठ प्रभागामध्ये व्यतीत केले होते. त्यांनी ज्युबिली हायस्कुल चंद्रपूर येथे आपले शिक्षण पूर्ण केले होते. त्यामुळे भानापेठ प्रभागातील नवीन पिढीला यांची माहिती व्हावी यासाठी आज येथे अभिवादन करण्यात येत आहे , असे मत सुरज पेदुलवार यांनी व्यक्त केले. दिनांक २४ नोव्हेंबर २०२५ रोजी भानापेठ प्रभागामध्ये महाराष्ट्र राज्याचे दुसरे मुख्यमंत्री मा. सा. कन्नमवार यांच्या अर्धकृती पुतळयाला मार्लापण करून बेलदार समाज समिती भानापेठ प्रभागाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. मा. सा. कन्नमवार यांनी आपले बालपण भानापेठ प्रभागामध्येच व्यतीत केले आहे. त्यांची राजकीय कारकीर्द याच प्रभागातुन सुरू झाली.
आपल्या प्रभागामध्ये ज्यांचे जीवन व्यतीत झाले ती व्यक्ती राज्याचे मुख्यमंत्री पद भूषविते ही आम्हा प्रभागवासियांना अत्यंत अभिमानाची बाब आहे, असेही पुढे सुरज पेदुलवार म्हणाले. यावेळी प्रामुख्याने प्रवीण कत्तुरवार,राहुल आकुलवार,संजय पोडचलवार, राजेश आकुलवार, सुनील मिलाल, विष्णू क्षीरसागर, किर्ती कत्तुरवार,स्वाती कत्तुरवार विद्या भुते, मंगला आकुलवार, अर्चना बोकडे, अल्का कन्नमवार, शोभा आकुलवार, धनश्री आकुलवार, मंगला कन्नमवार, तसेच इतर मान्यवरांची उपस्थिती होती.



