भद्रावतीत बर्निंग तेल टँकरचा थरार
टँकरमध्ये होते ४५०० लिटर तेल : मोठा अनर्थ टळला

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
अत्यंत ज्वलनशील असणारा सोयाबीन तेल वाहून नेणाऱ्या टँकरने अचानक पेट घेतला, मात्र अग्निशामक दलाने वेळीच घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण आणून आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला.
सदर घटना दिनांक १९ रोज बुधवार ला सकाळी ११. ०० वाजते दरम्यान शहरातील तहसील कार्यालय परिसरात चंद्रपूर-नागपूर रोडवर घडली. या अपघातात टँकर क्र. एम एच ३४ एम १७९५ चे नुकसान वगळता अन्य कोणतेही नुकसान झाले नाही. सदर टँकर हा राजेश सारडा यांच्या मलकिचा असुन तो हिंगणघाट येथील तेल कंपनितुन तेल भरून चंद्रपूरकडे चालला होता. भद्रावती तहसील कार्यालयाजवळ आला असता टँकरच्या केबिनमध्ये अच्यानक आग लागून आगीच्या ज्वाला निघू लागल्या.
चालक तथा इतर सहकारी वेळीच वाहन सोडून बाहेर निघाल्याने मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळतात भद्रावती पोलीस व नगर परिषदेचे अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवून आग विझवली.



