ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

इंदिरा नगर, वर्धा येथे बिरसा मुंडा जयंती उत्सहात साजरी 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

इंदिरा नगर, वर्धा येथे दिनांक १५ नोव्हेंबर २०२५, बिरसा मुंडा जयंतीच्या निमित्याने प्रकाश जिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर मा राजूभाऊ वाघमारे हे अध्यक्ष स्थानी होते, जननायक क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांचे विचार, हे आदिवासी समाजाला प्रेरणा देणारे आहेत.

आदिवासी बांधवानी आपल्या न्याय सामाजिक हक्कासाठी ‘ उलगुलान चळवळ जिवंत ठेवली पाहिजे, आजही आपला सामाजिक, आर्थिक स्तर उंचावलेला नाही त्यासाठी मुलांना शिकविले पाहिजे असे प्रतिपादन प्रकाश जिंदे यांनी केले तर सामाजिक एकोपा जोपासून राजकीय सक्रियता समाजात आली पाहिजे तसेच बिरसा मुंडा यांचे कार्य व विचार लहान मुलांना सांगितले पाहिजे आपण मूलनिवासी असूनही सातत्याने आपल्या बांधवारच अन्याय का हे सुद्धा आपण तपासले पाहिजे त्या करिता एकजुटीची फार आवश्यकता आहे.

असे प्रतिपादन राजू भाऊ वाघमारे यांनी केले, वासुदेवराव नैताम यांनी सुद्धा बिरसा मुंडा यांचे जीवन चरित्र समजावून सांगितले,विचार मंचावर राहुल उके आणि कांबळे साहेब उपस्थित होते, सूत्रसंचालन विनायक नैताम यांनी केले तर आभार पेंदाम सर यांनी केले, आयोजनासाठी गणेश पेंदोरे, देवानंद मसराम, पवन पेंदोरे यांनी परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये