राज्यस्तरीय शालेय खो खो स्पर्धेसाठी पालडोह येथील दोन मुलांची निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, पालडोह ही शाळा नेहमीच कोणत्या ना कोणत्या उपक्रमासाठी ओळखली जाते.या शाळेला खेळायला पुरेसे मैदान नाही,म्हणून मागील १२ वर्षापासून डांबरीकरण रस्त्याचा उपयोग करून सकाळी ४:३० वाजता पासून मुलांचा खेळण्याचा व धावण्याचा सराव करून घेतला जातो.
या डांबरीकरण रस्त्यावर मुलांचा खेळण्याचा सराव त्यामुळे आज या शाळेतील १४ वयोगटातील मुले व मुली यांनी जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेत चांगले प्रदर्शन करत मुलीच्या संघानी जिल्हास्तरीय खो खो अंतिम सामना एक डाव व २० गुणांनी जिंकत अव्वल स्थान पटकावत विभागातरावर झेप घेतली. मुलीच्या संघानी काटोल येथे विभागस्तरावर चांगले प्रदर्शन करत सेमी फायनल मध्ये हार पत्करावी लागली. या सामन्यात खेळाचे चांगले प्रदर्शन करत कु पल्लवी राठोड या मुलीने व अविनाश राठोड या मुलाने जिल्हा व विभाग स्तरावर उत्कृष्ठ खेळ करत राज्यस्तरीय खो खो स्पर्धेसाठी आपली निवड करून घेतली.
शाळेचे मुख्याध्यापक व क्रिडा मार्गदर्शक राजेंद्र परतेकी यांनी विभागस्तरीय सर्व खर्च उचलत या मुलांना खेळातून संधी उपलब्ध करून दिली.या मुलानी संधीचे सोन करत जिल्हा परिषद माध्यमिक शाळा,पालडोह चे नाव उंचावले त्यामुळे त्यांनी मुलांचे अभिनंदन केले. शाळेचे सहाय्यक शिक्षक सतीश गाकरे यांनी विभागावर मुलांना योग्य सहकार्य व मार्गदर्शन करत अभिनंदन केले.शाळेतील गजानन राठोड,सुनील आडे, विनोद खवशी, कु इंझळकर, सौ.धुळगुंडे, कु बोवाडे,कु चव्हाण, समस्त शालेय व्यवस्थापन समिती तथा समस्त गावकरी मंडळी यांनी मुलांचे अभिनंदन केले.
पालकांमध्ये यामुळे आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.जिवती तालुका हा आकांक्षित तालुका म्हणून ओळखला जातोय पण या मुलानी कुठलीही सोय नसताना चांगली कामगिरी करत राज्यस्तरावर झेप घेतली आहे.



