युवा नेते महेश देवकते यांनी शेणगाव गणातून पंचायत समितीची निवडणूक लढवावी
भाजपा कार्यकर्त्यांचा आग्रह
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे
जिवती :_ चंद्रपूर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी निवडणूक विभागाकडून जोरात सुरू आहे. प्रभाग रचना पूर्ण झाली असून, बूथनिहाय मतदारयाद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. आरक्षण सोडतीही पार पडल्या आहेत. यात काहींना आनंद, तर काहींना निराशा पदरी पडली आहे.
आरक्षणामुळे अनेक होतकरू नेतृत्वाला जिल्हा परिषदेच्या प्रतिनिधित्वाची संधी हुकली आहे.याच पार्श्वभूमीवर तालुक्यातील भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष महेश देवकते यांच्याकडे संपूर्ण तालुका आशेने पाहत आहे. गावोगावी फिरून समस्या जाणून घेणारे, आमदार-खासदार ते मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करणारे आणि नुकतेच वनक्षेत्र मुक्ततेसाठी आमदार देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली लढा देणारे हे युवा नेतृत्व लोकप्रिय आहे.मात्र जिवतीतील दोन्ही जिल्हा परिषद गट अनुसूचित जमाती करिता राखीव झाल्याने महेश देवकते यांना जिल्हा परिषद निवडणूक लढता येणार नाही. यामुळे त्यांचे कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर पसरला आहे.
महेश देवकते यांना जिल्हा परिषदेत प्रतिनिधित्व मिळाले असते, तर जिवतीला सभापती पद मिळून विकासाला चालना मिळेल अशी आशा होती मात्र आरक्षणामुळे ती आशाही आता हुकली काही कार्यकर्ते कोरपना किंवा राजुरा येथून जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी मागत आहेत; परंतु तेथे फक्त एकच सर्वसाधारण जागा असल्याने स्पर्धा जास्त आहे.त्यामुळे जिवती भाजपा पदाधिकारी व इतर पक्षांचे काही नेते महेश देवकते यांनी शेणगाव पंचायत समिती गणातून निवडणूक लढावी, असा आग्रह धरत आहेत.मात्र, महेश देवकते यांनी दोनदा पंचायत समितीची निवडणूक लढलेली असल्याने, “आता माझ्या कार्यकर्त्यांना संधी मिळायला हवी,” असे सांगत उमेदवारी नाकारत असले तरी जिवती तालुक्यातील भाजपा युवा मोर्चा, महिला आघाडी व सर्व आघाड्यांचे पदाधिकारी त्यांना विनंती करत आहेत.
शेणगाव गणातील इच्छुक उमेदवारही आमदार देवराव भोंगळे यांच्याकडे महेश देवकते यांनाच उमेदवारी द्यावी, असा आग्रह करणार आहेत.जेणेकरून जिवतीच्या समस्या सोडवण्याचा विडा उचललेल्या या लाडक्या नेतृत्वाला किमान पंचायत समितीत तरी जनतेचा आवाज बनता येईल.



