ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सायबर गुन्ह्यांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष व्याख्यानाचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दि. 17/11/2025 रोजी अपर पोलीस अधीक्षक वर्धा तसेच जिल्हा होमगार्ड समादेशक श्री. सदाशिव वाघमारे यांच्या विद्यमाने होमगार्ड कार्यालय, वर्धा येथे डिजिटल जगात वाढत चाललेल्या सायबर गुन्ह्यांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात वर्धा पोलीस विभागातील सायबर सेलचे सहा. पोलीस निरीक्षक आशिष चिलांगे, पोलीस अंमलदार अंकित जिभे व स्मिता महाजन यांनी होमगार्ड कॅडेट्सला ऑनलाईन फसवणूक, सोशल मिडिया सुरक्षा, डिजिटल स्वच्छता, सायबर कायदे आणि सायबर गुन्ह्यांची तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया यावर सविस्तर मार्गदर्शन केले.

.APK फसवणूक (APK Fraud) बाबत महत्त्वाचे मुद्दे

वक्त्यांनी विशेषतः वाढत चाललेल्या .APK फसवणुकीबाबत होमगार्ड कॅडेट्सना सतर्क केले. त्यांनी पुढील महत्वपूर्ण सूचना दिल्या:

• .APK फाईल म्हणजे Android Application Package जे कि मोबाईल मधील APP असते.

• व्हॉट्सअ‍ॅप किंवा इतर कोणत्याही माध्यमातून आलेली .APK फाईल कधीही डाउनलोड करू नये.

• अशा फाईल्स इंस्टॉल केल्यास SMS, Call Logs, Notifications हॅक होण्याचा धोका असतो.

• गुन्हेगार OTP चोरी, बँकिंग अ‍ॅप्सवर नियंत्रण, आर्थिक फसवणूक, E-SIM बनवीने अशा गंभीर गुन्ह्यांसाठी या पद्धतीचा वापर करतात.

• कोणतीही संशयास्पद लिंक किंवा फाईल प्राप्त झाल्यास ती तात्काळ डिलीट करावी.

वक्त्यांनी स्पष्टपणे सांगितले की आपणास आलेली कोणतीही लिंक, APK फाईल डाउनलोड करू नये. तसेच वैयक्तिक माहिती, बँकिंग डिटेल्स, OTP कोणालाही देऊ नये. तसेच इतर सायबर गुन्ह्यांबाबत मार्गदर्शन केले. सायबर गुन्हा झाल्यास तात्काळ 1930 या सायबर हेल्पलाईन किंवा https://cybercrime.gov.in/ वर तक्रार नोंदवावी.

या कार्यक्रमाला केंद्र नायक श्री प्रमोद वानखेडे, पलटण नायक श्री प्रदीप बलवीर व ७० होमगार्ड कॅडेट्सनी उपस्थिती दर्शवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रश्नोत्तर सत्रात कॅडेट्सनी विविध प्रश्न विचारत सक्रिय सहभाग नोंदवला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये