ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजा शहरात मोबाईल चोरांचा सुळसुळाट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा शहरात दर शनिवारी मोठा आठवडी बाजार भरतो,या बाजारात शहरातील तसेच परीसरातील विविध गावातील नागरिक भाजीपाला खरेदीसाठी येतात, बाजारात होणाऱ्या गर्दी चा पुरेपूर फायदा मोबाईल चोर घेत आहेत.

प्रत्येक शनिवारी नागरिकांचे मोबाईल फोन चोरीला जात आहेत, मागील शनिवारी सुद्धा बऱ्याच नागरिकांचे मोबाईल फोन चोरीला गेले आहे, ज्या नागरिकांकडे मोबाईल खरेदी चे बिल होते त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

मात्र ज्या नागरिकांकडे बिल नव्हते त्यांना तक्रार दाखल करता आली नाही,10 हजार ते 1 लाख रुपयांचे मोबाईल चोरीला गेल्यामुळे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे,मोबाईल चोर अतिशय चलाख असून शर्टाच्या किंवा पॅण्ट च्या खिशातून मोबाईल अलगद लंपास करीत आहे,16 मार्च ला मोबाईल चोरी झालेल्या नागरिकांत शेतकरी, व्यापारी, नोकरदार, पत्रकार यांचा समावेश आहे, पोलिस विभागाने पोलिसांना सिव्हिल ड्रेस मध्ये बाजारात ठेऊन या मोबाईल चोरांचा शोध घ्यावा अशी मागणी करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये