एनडीएच्या बिहार विजयाचा चंद्रपुरात जल्लोष
भाजयुमो तर्फे भव्य रॅलीसह लाडु वाटप

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर : बिहार मधील दणदणीत विजयानंतर चंद्रपुरात मोठ्या जल्लोषात विजय रॅली काढण्यात आली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीने मागील निवडणुकीपेक्षा सरस कामगिरी करीत 243 पैकी 200 पेक्षा जास्त जागा जिंकून भव्य विजय साकार केला. या निवडणुकीत मतदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार व राज्यातील भाजपा नेतृत्वावर प्रचंड विश्वास व्यक्त करून तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाचा दणका दिला. विरोधकांना यावेळी पन्नाशीचा आकडा सुध्दा गाठता आला नाही.
बिहारमधील या अभुतपूर्व विजयानंतर चंद्रपुर येथे भाजयुमो तर्फे भव्य विजय रॅली काढून जल्लोष करून लाडू वाटप करण्यात आले. विजय रॅली ला संबोधित करतांना चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार किशोर जोरगेवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी जी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रसाद नड्डा जी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार जी यांचे अभिनंदन करीत बिहार मधील जनतेचे आभार मानले.
विजय रॅलीत आमदार किशोर जोरगेवार यांचेसह सुभाष कासनगोट्टूवार जिल्हाध्यक्ष, भाजपा चंद्रपूर महानगर, रघुवीर अहीर उपाध्यक्ष भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश, दशरथसिंग ठाकूर, वंदना हातगावकर, विनोद शेरकी, मनोज पाल, पूनम तिवारी, प्रदिप किरमे, सुभाष आदमाने, स्वप्निल डुकरे, गौतम यादव, राहुल सुर्यवंशी, सुदामा यादव, उग्रेसेंन पांडे, मुग्धा खाडे, गणेश गेडाम, मयुर भोकरे, पराग मलोडे, सुबोध चिकटे व भाजपा व भाजयुमोचे महानगरातील अनेक पदाधिकारी, शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.



