ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून बल्लारपूर येथे ३६ कोटी ७० लक्ष रुपयांची न्यायालय इमारत मंजूर

बल्लारपूर बार असोसिएशनने मानले आ. सुधीर मुनगंटीवार यांचे आभार

चांदा ब्लास्ट

आ. मुनगंटीवार यांच्यामुळे बल्लारपूर तालुक्यातील नागरिकांचे न्यायालय इमारतीचे स्वप्न होणार साकार

बल्लारपूर – राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे बल्लारपूर तालुक्यातील नागरिकांचे अनेक वर्षांपासूनचे आधुनिक आणि प्रशस्त न्यायालयीन इमारतीचे स्वप्न अखेर पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. आ. मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ३६ कोटी ७० लक्ष रुपये किंमतीच्या मुख्य न्यायालयीन इमारतीच्या बांधकामाला मंजुरी मिळाली असून, यामुळे तालुक्याच्या न्यायव्यवस्थेला नवी दिशा मिळणार आहे. आ. मुनगंटीवार यांच्या या महत्त्वपूर्ण पुढाकाराबद्दल बल्लारपूर तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड सय्यद सर, उपाध्यक्ष ॲड किशोर पुसलवार, सचिव ॲड संजय बोराडे आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ₹३६ कोटी ७० लक्ष रुपये मुख्य न्यायालयीन इमारतीसह वकिलांसाठी अत्याधुनिक सभागृहासाठी १ कोटी ७२ लक्ष रूपये आणि न्यायाधीशांच्या निवासस्थानासाठी ४ कोटी ७८ लक्ष रुपये मंजूर झाले आहेत. अनेक वर्षांपासून याठिकाणी सुविधांचा अभाव आहे. अश्याच अवस्थेत सुरू असलेले कामकाज, जागेची कमतरता आणि नागरिकांची गैरसोय आता दूर होणार आहे. आधुनिक सुविधा, सुरक्षित परिसर आणि कार्यक्षम व्यवस्था यामुळे न्यायप्रक्रियेला मोठी गती मिळणार आहे.

या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने बैठका घेत राज्य सरकारकडे ठामपणे पाठपुरावा केला. अधिवक्ता बैठकीत दिलेल्या आश्वासनाची त्यांनी प्रत्यक्ष पूर्तता करत दिलेला शब्द निभावला. या संपूर्ण प्रक्रियेत त्यांनी दाखवलेला पुढाकार, प्रामाणिक बांधिलकी आणि प्रत्येक टप्प्यावर केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा याबद्दल बल्लारपूर तालुका बार असोसिएशनने त्यांचे आभार मानले आहे. “विधी क्षेत्र कायम आपले कृतज्ञ राहील,” अशा भावनिक शब्दांत अध्यक्ष ॲड सय्यद सर, उपाध्यक्ष ॲड किशोर पुसलवार, सचिव ॲड. संजय बोराडे, सहसचिव ॲड अरविंद तितरे, कोषाध्यक्ष ॲड विकास गेडाम, सदस्य ॲड प्रणय काकडे, ॲड बी. एस. खनके, ॲड अविनाश सिंह या सर्व पदाधिकाऱ्यांनी आ. मुनगंटीवार यांचे आभार मानले आहे.

यासोबतच न्यायालय इमारतीच्या उभारणीचा निर्णय हा केवळ एका प्रकल्पाचा शुभारंभ नसून, न्याय आणि पारदर्शकतेच्या दिशेने उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे. आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या विकासाभिमुख नेतृत्वामुळे बल्लारपूर तालुक्याचा न्यायव्यवस्थेतील नवा अध्याय सुरू होत असल्याचा विश्वास बल्लारपूर तालुका बार असोसिएशनने व्यक्त केला आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये