ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अल्पवयीन मुलीस पळवून नेलेल्या आरोपीस अत्यंत शिताफीने वर्धा येथून ताब्यात

गुन्हा उघडफिस ; पुढील तपास सुरू

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

यातील फिर्यादी यांनी पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे तोंडी रिपोर्ट दिला की त्यांची अल्पवयीन मुलगी वय 17 वर्षे हिला कोणीतरी अज्ञात इसमाने फुस लावून पळवून नेले.

फियादीचे रिपोर्ट वरून पो.स्टे. हिंगणघाट येथे अप क्र. 1396/25 कलम 137(2) बी. एन. एस प्रमाणे गुन्हा नोंद करून तपासात घेतला.

सदर गुन्याचा समांतर तपास अनैतीक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखा, वर्धा यांनी केला असता मा. श्री. अनुराग जैन, पोलीस अधीक्षक, वर्धा यांनी दिलेल्या विशेष सुचना व निर्देशाप्रमाणे पोलीस निरीक्षक देवेंद्र ठाकूर, अनैतीक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखा, वर्धा यांचे मार्गदर्शनात पथक तयार करण्यात आले.

सदर गुन्ह्यात खात्रीशीर मुखबीर लावून व तांत्रीक तपास करण्यात आला. त्या अनुषंगाने आरोपीची व पिडीत मुलीची माहीती संकलीत करून यातील आरोपी नामे यश दिलीप इरपाते वय 25 वर्षे रा. शेडेश्वर ता. उमरेड जि. नागपुर ह. मु. आलोडी वर्धा हा वर्धा येथे असल्याचे निष्पन्न झाल्याने पथकाने अत्यंत शिताफीने सापळा रचुन आरोपीस आलोडी वर्धा येथुन ताब्यात घेण्यात आले. अल्पव‌यीन पीडीत मुलीबाबत विचारपूस केली असता मुलगी त्याचे सोबत राहात असल्याचे सांगीतल्याने यातील पिडीत अल्पवयीन मुलीस आलोडी, वर्धा येथून ताब्यात घेण्यात आले आरोपीस कायद्याप्रमाने रितसर अटक करून पुढील तपास पो. स्टे. हिंगणघाट करीत आहे.

अल्पवयीन मुलगी रितसर कायद्याप्रमाणे पो. स्टे. हिंगणघाट यांच्याकडे देण्यात आले आहे. सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक, वर्धा श्री.अनुराग जैन, अप्पर पोलीस अधीक्षक, वर्धा सदाशिव वाघमारे यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस निरीक्षक देवेद्र ठाकुर अनैतीक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखा, वर्धा यांचे मार्गदर्शनात सफौ सुभाष राऊत, दिवाकर परिमल, पोहवा नितेश मेश्राम, संजय राठोड, शबाना शेख, पोलीस अंमलदार नवनाथ मुंडे अनैतीक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखा, वर्धा तसेच सायबर सेल, वर्धा येथील अक्षय राऊत, गोविंद मुंडे यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये