ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गांजा अंमली पदार्थाची तस्करी करणा-या गुन्हेगारांवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

   माननीय श्री. अनुराग जैन पोलीस अधीक्षक वर्धा यांनी अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणारे गुन्हेगारांवर धडक कारवाई करण्याचे स्थानिक गुन्हे शाखेस आदेशीत केल्याने, त्या अनुषंगाने अंमली पदार्थांची विक्री करणा-या गुन्हेगारांवर कारवाई करण्याची स्थानिक गुन्हे शाखेने धडक मोहिम राबविली असुन, दि. 13 नोव्हेंबर 2025 रोजी स्था.गु.शा. वर्धा चे पथकास मौजा नांदोरा शिवार, सेवाग्राम ते नांदोरा रोडवर गांजा अंमली पदार्थांची तस्करी होणार असल्याबाबत मिळालेल्या गोपणीय माहितीवरून.,

पथकाने मौजा नांदोरा शिवार येथे एन.डि.पी.एस. कायद्यान्वये रेड केला असता, तेथे आरोपी क्र 1) संघर्ष सुनील लोखंडे रा. वार्ड क्र. 03 मदनी, तह. जिल्हा वर्धा 2) रवींद्र रायभान मेश्राम रा. संत तुकडोजी वार्ड नंदोरी चौक ज्योती टॉकीज जवळ हिंगणघाट 3) सुशील उर्फ जब्बा संजय इंदुरकर रा. रामनगर वार्ड हिंगणघाट हे मोक्कावर हजर मिळुन आले असुन, आरोपी क्र 4) शुध्दोधन उर्फ सिध्दु माटे रा. कार ला वर्धा यास पोलीसांची चाहुल लागताचं मोक्कावरून पळुन पसार झाला. आरोपीतांचे ताब्यातुन निव्वळ 2 किलो 109 ग्रॅम गांजा अमली पदार्थ, वाहतुकीकरीता वापरलेली एक सुझुकि अॅल्टो कार क्र. MH-34/K-3805 व एक अॅक्सेस 125 मोपेड क्र. MH-32/AT-3494 तसेच तीन मोबाईलसह जु.कि. 3,74,180 रु चा मुद्देमाल जप्त करून, सर्व आरोपीतांविरूध्द पो.स्टे. सेवाग्राम येथे एन.डी.पि.एस. कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहेत.

  सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री. अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, यांचे निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी, पो.उपनि. प्रकाश लसुंते, पो.अं अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, रवि पुरोहित, अभिषेक नाईक, अखिल इंगळे, अक्षय राऊत सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये