सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजि येथे सॉफ्ट स्किल्सवर सेमिनारचे आयोजित

चांदा ब्लास्ट
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाद्वारे संचालित सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजि तर्फे विद्यार्थ्यासाठी सॉफ्ट स्किल्स याविषयावर सेमिनार आयोजित करण्यात आले, यावेळी सोमय्या ग्रुपचे अध्यक्ष पी. एस. आंबटकर सर, उपाध्यक्ष पियुष पी. आंबटकर सर, संचालक अंकिता पी. आंबटकर, आणि प्राचार्य डॉ. हिरेंद्र हजारे सर, डॉ. उज्वला सावरकर मॅडम उपस्थित होते. श्री. मा. अनुप दांडी सर यांना पुष्पगुच्छ देऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आले.
श्री. अनुप दांडी सर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असताना सॉफ्ट स्किल्स बद्दल माहिती दिली. स्पेर्धेत रोजगार मिळविण्याकरिता विविध स्किल्स यावर मार्गदर्शन केले. येण्याऱ्या काळात वाढत्या स्पेर्धेत यश प्राप्त करण्याकरिता इंग्लिश स्पिंकिंग व कम्युनिकेशन यावर स्किल्समध्ये कश्याप्रकारे सुधार करता येईल व औद्योगिक क्षेत्रातील स्किल्स यांचे महत्व पटवून दिले. तसेच विविध औद्योगिक क्षेत्र व त्यात आवश्यक विविध महत्वपूर्ण स्किल्स कसे आत्मसात करता येईल यावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक प्राध्यापक ईशान नंदनवार सर यांनी केले. या कार्यक्रमाला सर्व विभाग प्रमुख आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.



