Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुलींची टक्केवारी वाढविण्यासाठी शासनाने प्रभावीपणे जनजागृती करावी

आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

चांदा ब्लास्ट

जिल्ह्यात शिक्षणाचा टक्का वाढला आहे. त्यासोबतच मानसिक प्रगती देखील झाली आहे. परंतु वंशाचा दिवा पाहिजे ही मानसिकता बदलविण्यात शासन कमी पडत आहे. कारण २०२२-२३ मध्ये मुलींचा जन्मदर हजार मुलांमागे ९३९ आसल्याची माहिती पुढे आली. मुलींच्या जन्मदरात घट झाली तर मुलांना लग्नासाठी मुली मिळेल का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना राबून जनजागृती अधिक प्रभावी करण्याची मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
                 सन २०११ च्या जणगणनेतूसार जिल्ह्याची एकूण लोकसंख्या २०,०४,३०७ असून त्यापैकी ११,२३,८३४ पुरुष व १०,८०,४७३ महिला आहेत. जिल्ह्यात २००१ ते २०११ चा दशवार्षीक वृद्धिदर ६.४ टक्के आहे. राज्याच्या वाढीच्या दरापेक्षा हा दर १६ टक्क्यांनी कमी आहे. २०११ च्या जणगणनेतूसार एकूण लोकसंख्येपैकी चंद्रपूर तालुक्यात सर्वाधिक २१.८ टक्के लोक राहतात तर पोंभुर्णा तालुक्यात सर्वात कमी म्हणजे २ टक्के लोक राहतात. अशी जिल्ह्याची परिस्थिती आहे.
जिल्ह्यात २०११ च्या जनगणनेनुसार दर हजार पुरुषांमागे महिलांचे प्रमाण ९६२ असून महाराष्ट्राच्या तुलनेत ९२९ च्या तुलनेत ३२ ने अधिक आहे. ग्रामीण व नागरी भागात हे प्रमाण ९५० आणि ९६८ इतके आहे. तसेच ०-६ वयोगटानुसार दर हजार पुरुषांमागे महिलांचे प्रमाण ९५३ आहे.
त्यामुळे हि परिस्थिती अतिशय गंभीर असून मुलींच्या जन्मदराची टक्केवारी वाढविण्यासाठी जनजागृती अधीक प्रभावी पद्धतीने राबविण्याची गरज आहे.
शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये