दारू पिवून दारूच्या नशेत मोटार सायकल चालविणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल
मोटारसायकल जप्त तसेच मोठ्या आवाजचे 12 बुलेटचे सायलेंसर जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दि. 13/11/25 रोजी 11.00 वाजेच्या दरम्यान आर्वी नाका चौकात वाहतूक पोलीस अंमलदार हे आपली ड्युटी करीत असताना त्यांना एक मोटार सायकल चालक हा अतिवेगाने निष्काळजीपणे वाहन चालवीतना दिसून आला त्याचे त्याच्या गाडीवरही नियंत्रण नव्हते त्यावरून त्याचे जवळ जाऊन पाहणी केली असता तो दारूच्या नशेत डुलत असल्याचे दिसून आले त्यावरून त्याची वैद्यकीय तपासणी केली असता तो दारू पिल्याचे व दारूच्या नशेत असल्याचे आढळून आले त्यावरून मोटार सायकल हिरो होंडा वाहन नंबर MH 32AM 5126 हिचा चालक नाव स्वप्नील सतीशरावं शेडमाके रा आर्वी नाका साने गुरुजी नगर वर्धा याच्या विरुद्ध मोटार वाहन कायदा कलम 185 अन्वये गुन्हा दाखल करून सदर वाहन मोटार सायकल हे वाहतूक पोलिसांनी जप्त केलेले आहे.
तसेच बुलेट गाडीचे मोठ्या आवाजचे बनावट सायलेंसर जे मोठा आवाज करतात फटाके फोडतात इतर नागरिकांना त्रास होईल असा मोठा कर्कश आवाज करून वाहन चालवीतात असे 12 बुलेट सायलेंसर ही वाहतूक पोलिसांनी आज मोटार वाहन कायदा कलम 194 अन्वये कार्यवाही करून जप्त केलेले आहेत. तरी बुलेट चालक यांना आवाहान आहे कि मोठ्या आवाजाचे डुप्लिकेट सायलेंसर लावून वाहन चालवू नये अन्यथा सायलेंसर हे जप्त करण्यात येतील.
सदर कार्यवाही ही सहायक फोजदार संजय भांडेकर, सय्यद शब्बीर, संजय कांमडी, आशिष देशमुख यांनी आर्वी नाका परिसरात आज केली आहे.
पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा वर्धा.



