सावंगी पोलीसांकडून 48 तासाचे आत बळजनरीने मोबाईल हिसकावुन नेणारे आरोपीस अटक करून गुन्हा उघड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी अविनाश नागदेवे
पोलीस स्टेशन सावंगी मेघे येथे फिर्यादी शिवकुमार राजेश्वर आत्राम वय 28 वर्ष रा.बोरगाव मेघे, ता.जि. वर्धा यांनी तकार दिली की फिर्यादी हा त्याचे मित्रासह त्याचे मोटार सायकलने यवतमाळ वरून त्याचे मोटार सायकलने वर्धा येथे येत असतांना सेलसुरा पुलावरून रात्री 10/00 वा. सुमारास पुलाखाली उतरत असतांना एक अनोळखी इसम त्याचे मोटार सायकलने फिर्यादी याचे जवळ येवुन वाद करून फिर्यादी याचा वापरत असलेला विवो कंपनीचा मोबाईल कि.9000/रू. असा बळजबरीने हिसकावुन नेला अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून पो,स्टे सावंगी मेघे येथे अज्ञात आरोपी विरूध्द अपराध कर्माक 887/2025 कलम 304(2), 305 (अ) बी.एन.एस. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून मा. प्रभारी ठाणेदार श्री पंकज वाघोडे साहेब, पो.स्टे सावंगी यांचे प्रत्यक्ष मार्गदर्षनात पोलीस स्टेशन सावंगी मेघे येथील गुन्हे शोध पथक हे अज्ञात आरोपींचे व चोरीस गेलेल्या मालाचे शोधात असताना मुखबीरकडून मिळालेल्या माहितीवरून रंजीत राजु पारीसे, रा. बेघरवस्ती, देवळी, जि. वर्धा यास ताब्यात घेवुन विचारपुस करून गुन्हयातील चोरीस गेलेला वरील प्रमाणे मोबाइल कि.9000/रू.चा मुद्देमाल मिळून आल्याने व आरोपीने कुन्हा केल्याचे पंचासमक्ष कबूल केल्याने आरोपीस सदर गुन्हयात अठक करण्य आली.
सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधीक्षक श्री अनुराग जैन साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री सदाशिव वाघमारे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रमोद मकेश्वर साहेब, यांचे मांर्गदर्शनात सहा. पोलीस निरीक्षक श्री पंकज वाघोडे सा, ठाणेदार पोलीस स्टेशन सावंगी मेघे, पो.उप.नि. विशाल डोणेकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय पंचमाई, निखील फुटाणे, हर्षवर्धन मून, अमोल जाधव, महिला पोलीस निलीमा गेडाम यांनी केलेली असून गुन्हयाचा पुढील तंपास हेड कॉन्स्टेबल अनिल वैदय हे करीत आहे.



