आदित्य बिर्ला पब्लिक स्कूल, माणिकगड येथे प्रभावशाली कर्करोग जनजागृती कार्यक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड माणिकगड सिमेंट वर्क्स सी एस आर, टाटा कॅन्सर फाउंडेशन, चंद्रपूर आणि अर्थ फाउंडेशन, गढचंदूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आदित्य बिर्ला पब्लिक स्कूल, माणिकगड येथे एक प्रभावशाली कर्करोग जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमात मुख, स्तन आणि गर्भाशय कर्करोगाबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. एकूण ६४ विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि कार्यक्रम प्रेरणादायी व प्रभावशाली ठरला.
डॉ. आशीष बर्बडे, डॉ. सूरज साळुंखे, डॉ. ट्विंकल आणि डॉ. नताशा यांनी विद्यार्थ्यांना कर्करोग प्रतिबंध, निरोगी सवयी आणि नशामुक्त जीवनाचे प्रभावशाली मार्गदर्शन केले. अर्थ फाउंडेशनचे डॉ. भूषण मोरे यांनी संतुलित आहार व पोषणावर प्रभावशाली सादरीकरण केले.
कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य श्री. सी. आर. मोहन यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली झाली. येर्पुडे सर, राजेश कुमार यादव सर आणि निलेश पांडे सर यांचे योगदान या कार्यक्रमाच्या यशात प्रभावशाली आणि मोलाचे ठरले.
शेवटी शाळेच्या शिक्षकवृंदाने सी एस आर टीमचे आभार मानले. विद्यार्थ्यांचा उत्साही सहभाग पाहून हा कार्यक्रम प्रभावशाली, प्रेरणादायी आणि जनजागृतीपर ठरला.



