जैन साधू साध्वी यांना सुरक्षा पुरवण्याची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
दरवर्षी राज्यात सकल जैन समाजामध्ये महत्त्वाचा समजला जाणारा *चातुर्मास* विविध धार्मिक सांस्कृतिक अध्यात्मिक कार्यक्रमाने साजरा झाल्यानंतर ठीक ठिकाणी वास्तव्यास असलेले सकल जैन समाजाचे साधू साध्वी भगवंत हे त्यांच्या पुढील निर्धारित ठिकाणी जाण्यासाठी कार्तिक सुदी 15 नोव्हेंबर पासून सुरुवात करतात त्यांच्या विहारांमध्ये संघ हा दररोज दहा ते वीस किलोमीटर पायी विहार करतात विहार समयी मार्गाने जात असताना यापूर्वी अनेकदा अपघात होऊन यामध्ये जैन साधू साध्वी यांना मोठ्या प्रमाणात दुखापत झालेली आहे तर अनेक ठिकाणी समाजकंटकाकडून व रोड रोमिओकडून छेड खाणीच्या घटना घडलेल्या आहेत यासाठी महाराष्ट्र राज्यातील गृह विभागाने जैन साधू साध्वी भगवंत यांचे पायी विहार प्रसंगी त्यांना व त्यांच्या सोबतच्या संपूर्ण संघाला सुरक्षा पुरवण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे *श्री वर्धमान विहार सेवा ग्रुपचे प्रमुख तथा भारतीय जैन संघटनेचे राज्य उपाध्यक्ष महेंद्र मंडलेचा यांनी केली आहे
याबाबत त्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की महाराष्ट्र राज्यात दिनांक 15 नोव्हेंबर पासून पुढे सकल जैन समाजातील *साधू साध्वी भगवंत* हे वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रावर जाण्यासाठी चातुर्मास समाप्तीनंतर विहार करण्यास प्रारंभ करतात नोव्हेंबर ते जुलै पर्यंत राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात यांचे वास्तव्य असते जैन साधू साध्वी हे पाई विहार करत असल्याने रस्त्याने मार्ग क्रमन करताना अनेकदा अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत व अनेक वेळेस जैन साधू साध्वी यांना फार मोठा त्रास सहन करावा लागलेला आहे जैन साधू साध्वी हे महान तपस्वी असल्याने व कोणत्याही प्रकारचे ऍलोपॅथिक औषधी ते घेत नसल्यामुळे त्यांना भयंकर त्रास होतो मात्र ते दर्शवत नाही तर अनेक वेळा विहारामध्ये समाजकंटकाकडून व रोड रोमियोंकडून त्यांना नाहक त्रास देण्याचा प्रयत्न झालेला आहे.
भविष्यात अशा घटना घडवू नये अपघात होऊ नये यासाठी राज्यातील ज्या ज्या जिल्ह्यातून जैन साधू साध्वी पायी विहार करणार आहेत त्या त्या ठिकाणी त्यांना पोलीस सुरक्षा देण्याची मागणी निवेदनातून महेंद्र मंडलेचा यांनी केली आहे.



