‘Sardar@150 Unity March’ — सरदार पटेल यांच्या १५० वी जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय पदयात्रा संपन्न

चांदा ब्लास्ट
भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 वी जयंतीनिमित्त “Sardar@150 Unity March” या जिल्हास्तरीय पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. ही पदयात्रा चंद्रपूर जिल्ह्यातील वढा गावातून पांढरकवडा पर्यंत मोठ्या उत्साहात पार पडली. या पदयात्रेमध्ये भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, स्थानिक ग्रामस्थ, शाळकरी विद्यार्थी आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. विद्यार्थ्यांनी “भारत माता की जय”, “नशामुक्त भारत” अशा घोषणांनी परिसर दुमदुमवला. कार्यक्रमाचा समारोप पांढरकवडा येथे करण्यात आला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना भाजप महानगर जिल्हाध्यक्ष सुभाषभाऊ कासनगोट्टूवार, म्हणाले,
> “भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी संस्थानांना विश्वासात घेऊन ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेची पूर्तता केली. इंग्रज राज्यकर्ते भारताचे तुकडे होतील असे म्हणत होते, मात्र सरदार पटेल यांच्या नेतृत्वगुणामुळे आज आपण एकसंध भारत पाहतो. त्यांचे कार्य आणि दूरदृष्टी भारताच्या एकतेचे मूळ आहेत.”
तसेच पदयात्रा मध्ये सरपंच पांढरकवडा सूरज तोतडे, ज्येष्ठ नागरिक लक्ष्मणराव वाडगुरे यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन भाजप महानगरचे महामंत्री नामदेवजी डाहुले यांनी केले. कार्यक्रमाला महामंत्री रवींद्र गुरूनुले, मंडळ अध्यक्ष विनोद खेवले, तालुका महिला अध्यक्ष दुर्गाताई बावणे, पदवीधर नोंदणी प्रमुख सुमित बेले, राकेश पिंपळकर, ममता मोरे, युवा मोर्चा अध्यक्ष आशिष वाढई, शितल तोटा तसेच भाजप कार्यकर्ते व पांढरकवडा परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पदयात्रेद्वारे राष्ट्रीय एकता, नशामुक्त भारत आणि देशभक्तीचा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्यात आला.



