मतदारांना हवा सुशिक्षीत ऊमेदवार : रश्मी विक्रांत बिसेन यांना वाढता जनाधार
भद्रावती न.प.निवडणूक : प्रभाग १४

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती नगर परीषदेच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाली तशी मतदार व ऊमेदवारांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.शहरातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या प्रभाग क्रमांक १४ कडे संपुर्ण शहराचे लक्ष लागले आहेत.
तिन जागा असलेल्या या प्रभागात सर्वसाधारण महिला,ओबीसी महिला आणि एस.टी.महिला असे आरक्षण आहे.तिन्ही जागांवर महिला ऊमेदवार असल्याने या प्रभागातील महिला वर्गात कमालीचा उत्साह दिसुन येत आहे.या प्रभागातील मतदारांना सुशिक्षीत व कार्यक्षम ऊमेदवार हवा आहे.त्यामुळे या प्रभागात ऊच्चशिक्षीत ऊमेदवारांचे प्राबल्य राहणार असे दिसून येत आहे.या पार्श्वभूमीवर येथील सुशिक्षीत असलेल्या रश्मी विक्रांत बिसेन यांना संभाव्य ऊमेदवार म्हणुन पहिली पसंती दिसत असुन त्यांच्या मागे वाढता जनाधार असल्याचे मतदारांच्या चर्चेतून दिसुन येत आहे.
रश्मी बिसेन या शहरातील सामाजीक व शैक्षणीक कार्यात सतत अग्रेसर असणाऱ्या सामाजीक कार्यकर्ते विक्रांत बिसेन यांच्या अर्धांगिणी आहेत.रश्मी विक्रांत बिसेन यांना या प्रभागातून उमेदवारी मिळाल्यास त्यांना विजयाची संधी मिळणार असे मतदारांच्या चर्चेतून दिसुन येत आहे.रश्मी विक्रांत बिसेन यांचे शिक्षण बी.ई.,एम.टेक.इतके झाले असुन त्या शहरातील श्री साई इंजिनीअरिंग महाविद्यालयात प्रोफेसर म्हणुन कार्यरत आहेत.इनरव्हील क्लब तथा रोटरी क्लबच्या माध्यमातून त्या जनसेवेशी जुळलेल्या असुन त्या माध्यमातून त्यांचे समाजसेवेचे कार्य निरंतर सुरु आहे.
युथ अगेन्स्ट करप्शन अँड बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून त्या जनसामान्यांमधे जनजागृतीचे कार्य करीत असुन एक सुजान व जाग्त नागरीक निर्माण करण्याची त्यांची धडपड सुरु आहे. याशिवाय श्री स्कील एजुकेशन च्या माध्यमातून सुशिक्षीत व आदर्श विद्यार्थी घडविण्यासाठी त्या सतत प्रयत्नशील आहे.शिक्षण व समाजसेवा या क्षेत्रात अग्रेसर असलेल्या रश्मी विक्रांत बिसेन या सध्यातरी पात्र व आदर्श भावी ऊमेदवार म्हणुन पुढे येतांना दिसत आहे.त्यामुळे या प्रभागात आदर्श भावी ऊमेदवार म्हणुन मतदारांमधे त्यांची चर्चा आहे.रश्मी बिसेन यांनीप्रभाग क्रमांक १४ मधुन भाजपकडे उमेदवारी मागत भाजपकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
त्यांना भाजपतर्फे उमेदवारी मिळाल्यास या निवडणुकीत सदर प्रभागातून भाजपचे पारडे निश्चीतपणे जड होणार आहे.सध्या ऊमेदवारांची भाजपकडून चाचपणी सुरु आहे.त्यासाठी या प्रभागासाठी भाजपतर्फे मुलाकतिही घेण्यात आल्या आहेत.रश्मी विक्रांत बिसेन यांना ही उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता असल्याने त्यांना ही उमेदवारी मिळाल्यास येथे भाजपच्या विजयाची शक्यता निर्माण होईल असे राजकीय जानकारांना वाटते.



