ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे शेतकरी विरोधी विचार निषेधार्ह 

शेतकरी संघटनेने केला तीव्र निषेध 

चांदा ब्लास्ट

       महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री मा.ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकतेच शेतकरी सोसायटी काढतात, कर्ज घेतात, कर्ज थकवतात आणि वारंवार कर्जमाफी मागतात, या वक्तव्याचा शेतकरी संघटना तीव्र निषेध करीत आहे. आधीच शेतकऱ्यांना खर्च भरून निघेल, एवढे रास्त भाव मिळत नाही. त्यामुळे शेतीत बचत येत नाही, म्हणून थकलेले कर्ज फेडावे ही इच्छा असतांना सुद्धा ” ऋण वैर हत्या चुकत नाही ” ही जाणीव असतांनाही शेतीत बचत येत नसल्यामुळे शेतकरी कर्ज फेडू शकत नाही. ही वस्तुस्थिती माहित असतांनाही आणि सरकारच्या शेतीविषयक चुकीच्या धोरणांमुळे ही परिस्थिती शेतक-यांवर ओढवत असून ना.विखे पाटील यांनी शेतक-यांबद्दल केलेल्या विधानांचा शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते माजी आमदार ॲड. वामनराव चटप, माजी आमदार सरोजताई काशीकर, प्रांताध्यक्ष ललित बहाळे, महिला आघाडी प्रांताध्यक्ष प्रज्ञाताई बापट, अनिल घनवट, शैलाताई देशपांडे, मधुकर हरणे, सीमाताई नरोडे, स्मिताताई खांदेभराड, शशिकांत भदाणे, विजय निवल, राजाभाऊ पुसदेकर, गुणवंत पाटील हंगरगेकर, संजय कोले यांनी तीव्र निषेध केला.

         केंद्र सरकारच्या जुलमी आयात – निर्यात धोरणांमुळे परदेशातील बाजारपेठांत शेतमाल विक्री करून जास्तीचे चार पैसेही जगाच्या बाजारातून शेतकऱ्यांना मिळवता येत नाही. तसेच राज्य व केंद्र सरकारची आर्थिक स्थिती खराब असल्यामुळे सर्व पिकांचे बाबतीत शेतमाल नाफेड अथवा पणन महासंघ त्यांच्या केंद्रावर खरेदी करू शकत नाही. केंद्र सरकारने विदेशातून आयात होणा-या कापूस आयातीवरील ११ टक्के शुल्क रद्द करून देशातील कापसाचे भाव पाडण्याचे पातक केले आहे. एवढेच नव्हे तर केंद्राने तूर व कडधान्या वरील आयात शुल्क पुर्णत: संपवून कापूस, सोयाबीन, तूर, चना, मूग या पिकांचे भाव पाडले आहे. याविषयी मंत्री महोदय काहीच का बोलत नाहीत, असा प्रश्न शेतकरी संघटनेने उपस्थित केला आहे.

             आज बाजारात किमान वैधानिक किंमतीपेक्षाही कमी भाव खुल्या बाजारात शेतकऱ्यांना मिळत आहे. याची राज्यकर्ते म्हणून जाणीव असूनही व स्वतः वारंवार मुळा आणि प्रवरा साखर कारखान्याकरिता, साखर कारखान्याच्या डिस्टिलरी करता व मुळा – प्रवरा वीज वितरण कंपनी कडे वारंवार कर्जमाफीची मागणी करून या योजनेचे लाभार्थी आहोत, याची जाण असूनही असे शेतकऱ्यांप्रती बेजबाबदारपणाचे वक्तव्य ना. विखे पाटील यांनी केले आहे. याचा शेतकरी संघटना जाहीर निषेध करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये